सप्रेम नमस्कार.
"शब्दबंध" ही मराठी ब्लॉगकारांची ई-सभा ६/७ जून २००९ रोजी आयोजित करण्याचा विचार आहे. मराठी ब्लॉगांमध्ये लघुनिबंध, कथा, प्रवासवर्णने, कविता, विडंबन, व्यक्तिचित्र, पाककृती, इत्यादि वैविध्यपूर्ण लेखनाद्वारे ब्लॉगकार अनेक वर्षांपासून मनोरंजन, ज्ञानदान तसेच समाजप्रबोधन करत आलेले आहेत. आपल्या ब्लॉगांमधल्या निवडक पोस्टांचं अभिवाचन करणे व ब्लॉगजगतातल्या आपल्या बांधवांशी मनमोकळ्या गप्पा मारणे हा या ई-सभेचा उद्देश आहे. मराठीमध्ये १००% स्वतःचं लेखन असलेला किमान एक ब्लॉग असलेल्या कुठल्याही ब्लॉगकाराला यात सहभागी होता येईल. या ई-सभेत अधिकाधिक ब्लॉगकारांना सामील करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी सर्वांकडून सहकार्य व ज्यांना शक्य असेल त्यांच्याकडून मदत अपेक्षित आहे.
ब्लॉगकारांच्या प्रतिसादाचा अंदाज आल्यावर एखाद्या शनिवार/रविवारची तारीख निश्चित करता येईल.
जगभर चालणार्या या ई-सभेचं स्वरूप साधारणपणे असं असेल -
जपान-ऑस्ट्रेलियापासून ही सभा सुरू होईल. सत्रांची सूत्र क्रमाक्रमाने पश्चिमेकडे हस्तांतरित होऊन भारत-आफ़्रिका-युरोप-अमेरिका या क्रमाने अभिवाचनाचं सत्र सुरू राहील.
देशांतल्या/देशसमूहांतल्या/सत्रांतल्या सहभागी ब्लॉगकारांच्या संख्येनुसार सत्राच्या वेळा व सत्र भरवण्याचं माध्यम ठरवावं लागेल.
स्काईप (www.skype.com)च्या मेसेंजरवर एका वेळी २५ सदस्य सभेमध्ये सहभागी होऊ शकतात. समांतर सत्रे ठेवायची असल्यास स्काईपचा विचार करता येईल, पण त्यापेक्षा अधिक चांगलं माध्यम असल्यास जास्त सोयीस्कर असेल. डिमडिम (www.dimdim.com) द्वारे एकावेळी १०० सदस्य सहभागी होऊ शकतात. अर्थात, याबद्दल चाचणी घेणं आवश्यक आहे. या व्यतिरिक्त अमेरिकेत व काही देशांमध्ये निःशुल्क टेलिकॉन्फ़रन्सिंगची सोय आहे. या माध्यमांपैकी काहींचा आपल्याला निश्चित उपयोग होऊ शकतो. अर्थात, आणखी माध्यमं उपलब्ध असल्यास त्याची माहिती अवश्य द्या. अधिकाधिक लोकांना सहभागी होता आलं, तर आपल्या सत्राप्रमाणेच इतर सत्रांतल्या सदस्यांचं अभिवाचन ऐकण्याचा आस्वादही सर्वांना घेता येईल. या सत्रांच्या सूत्रसंचालन करण्याची तुमची तयारी असेल तर अवश्य कळवा.
या ई-सभेत सहभागी होण्यासाठी इच्छुक ब्लॉगबांधवांनी shabdabandha@googlegroups.com या गुगलग्रुपमध्ये प्रवेश घ्यावा अशी विनंती. त्यासाठी shabdabandha@gmail.com येथे ईमेल पाठवावा. ईमेलमध्ये आपलं नांव, शहर/राज्य/देश तसेच आपल्या मराठी ब्लॉगचं शीर्षक व दुवा अवश्य द्या.
ई-सभेच्या आयोजनासाठी मदत करू इच्छित असल्यास त्याबद्दलही लिहा.
सभेची आखणी व नियोजन करण्याच्या दृष्टीने कृपया आपल्या सहभागाबद्दल ३० एप्रिल २००९ पर्यंत कळवा.
धन्यवाद.
-शब्दबंध
18 comments:
This is an automatically generated Delivery Status Notification
Delivery to the following recipient failed permanently:
shabdabanda@gmail.com
Technical details of permanent failure:
The email account that you tried to reach does not exist
आमंत्रणाबद्दल मनापासून धन्यवाद.
उत्तमोत्तम लिहिणारे ब्लॉगर्स या उपक्रमामध्ये आपापल्या पोस्ट्सच वाचन करतील, आणि हे ऐकायला मिळणं म्हणजे पर्वणीच आहे! शुभेच्छा! नुसतं ऐकायला म्हणून सामील होता येईल का? काही मदत करु शकत असेन तर जरुर सांगा, आवडेलच मदत करायला, फक्त आत्ता मलाच अंदाज नाही की मी काय मदत करु शकते...
उपक्रम वाखाणण्याजोगा.
आपला उपक्रम नावीन्यपूर्ण आहे. माझी भाग घ्यावयाची जरूर इच्छा आहे. मी गेले जवळजवळ वर्षभर तीन-चार ब्लॉग मराठीतून चालवत आहे. सध्या मी मुंबईत आहे पण जूनमध्ये कदाचित कॅलिफोर्नियात असेन, पण भाग जरूर घेईन. ई-मेलद्वारा इतर माहिती पाठवत आहे. ई-मेलचा पत्ता shabdabandha@gmail.com असावा, banda नव्हे!
अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
हरेकृष्णजी व फडणीसकाका,
चूक निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद. "shabdabadha" असाच ईमेल आहे. पोस्टात दुरुस्ती केली.
प्रशांत मी त्या वेळी एन्डरसनलाच असणार तरी भाग घेता येईल.
मी एप्रिल मधे पुण्यात येणार आहे आणि 3 महिने मी पुण्यात आहे, मी नक्की भाग घेईन.
खूप खूप आभार असा उपक्रम सुरू केल्याबद्दल!!!
- अभिजीत राजवाडे
मी नक्की भाग घेईन. अपडेट कराल का प्लीज.. sonalgd@gmail.com
Mi maithili. kharetar mi aatta aattach blog lihine suru kele aahe. pan ithalya sagalyani mala itale chhan samaavoon ghetalay ki ase vaatate varshanu varshe blog lihit aahe. tumacha upkram aavadala. malahi sahabhagi hota yeil ka? aani hya upakramaache sampoorn svaroop kalel ka ? plz rly on my blog. i m waiting 4 it.
आमंत्रणाबद्दल धन्यवाद. उपक्रम छान आहे. भाग घ्यायला आवडेल. यशोधरानी म्हटल्याप्रमाणे फक्त श्रवणभक्तीसाठी पण सामील होता येईल का? जूनमध्ये किती वेळ असेल ते अत्ताच संगणे अवघड आहे, पण मदत करायला आवडेल.
नमस्कार. मी प्रमोद देव. मुंबईत असतो. माझ्या दोन जालनिश्या आहेत. १)पूर्वानुभव २)त्यांची कविता माझे गाणे.
आपल्या उपक्रमात मला भाग घ्यायला आवडेल.
नमस्कार !!
आपल्या आमंत्रणाबद्दल खूप खूप धन्यवाद !! मला अगदी मनापासून आवडेल ह्या उपक्रमात भाग घ्यायला.
मी कुवेतला असते. पण भारतात जुलै, ऑगस्ट मधे असते.
कशी सुरवात आणि काय करायचं ह्याबद्दल आपण मार्गदर्शन करालच.
धन्यवाद :)
Prashant, sorry roman lipit lihitey pan hya lqp top wqr mqrqthi fonts nahiyet. hya charcha satracha kanhi wishay asanar aahe ka ? Kalaw.
Aamantrana baddal mana pasun dhanyawad... mala bhag ghenyas nakkich aawadale asate...parantu 6 june la maze lagna aahe :)
punha kadhi asa upakram aasel tar nakki kalawa...orkut war mi aahech ..
punha ekada aabhar ani shubhechha !!!
Shardul
PS- roman lipi madhye lihit asalya baddal sorry.
नमस्कार, शब्दबंधची अभिवाचनाची कल्पना आवडली, भाग घ्यायला आणि ऐकायला अर्थातच आवडेल.
स्वाती दिनेश
शब्दबंध चा उपक्रम स्तुत्यच आहे...पण यात सहभागी होण्याच्या प्रक्रियेविषयी नीट कळलं नाही. शिवाय,मायक्रोफोन्स ची सुविधा उपलब्ध नसेल तर फक्त ऐकण्यासाठी सहभागी होता येईल का?
सहभागास संपूर्ण तयारी. काही मदत करु शकत असेन तर जरुर सांगा, आवडेलच मदत करायला.
v.k9121@gmail.com http://skillsvap.blogspot.com
Post a Comment