Wednesday, June 2, 2010

शब्दबंध २०१० - सत्रांचं वेळापत्रक व सदस्यांची यादी


"शब्दबंध" ही मराठी ब्लॉगकारांची ब्लॉग अभिवाचनाची ई-सभा भारतीय प्रमाणवेळेनुसार शनिवार दि. ५ जून २०१० रोजी सकाळी ९:०० वाजता सुरू होणार असून ६ जून २०१० रोजी पहाटे २:३० वाजेपर्यंत चालेल. सत्रांचं वेळापत्रक व सहभागी सदस्यांची नावं खालीलप्रमाणे:

भारत, शनिवार दि. ५ जून २०१०
सत्र क्र. १ – भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ९:०० ते दुपारी १२:३०
सहभागी सदस्य:
१. संग्राम भोसले (निमंत्रक, शब्दबंध २०१०)
२. प्रशांत उदय मनोहर - लेखणीतली शाई
३. तुषार जोशी - तुषार जोशी, नागपुर
४. संतोष साळुंके - नवा शिपाई
५. हर्षा - काही मनातलं - तुमच्या नि माझ्यासुद्धा
६. नरेंद्र गोळे - नरेंद्र गोळे
७. श्रीराम पेंडसे - श्रीरामसत्र क्र. २ – भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १:३० ते दुपारी ४:३०
सहभागी सदस्य:
१. क्रांती साडेकर
२. प्रभाकर फडणीस - आवडलेली पुस्तके
३. जयंत कुलकर्णी - मराठीतील लेखन-जयंत कुलकर्णी
४. विद्याधर - "बाबा"ची भिंत !
५. पल्लवी - मनातले भाव कवितेच्या रूपात
६. अमेय धामणकर - मदनबाण
७. प्रतिमा मनोहर - मनातलं विश्व
८. जयश्री कुलकर्णी - माझी मी अशी मी
९. लीना मेहेंदळे


सत्र क्र. ३ – भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी ५:०० ते रात्रौ ८:००
सहभागी सदस्य:
१. प्रमोद देव - पूर्वानुभव
२. क्रांती साडेकर - अग्निसखा
३. चैताली आहेर - माझ्या कविता
४. विनायक रानडे - विनायक उवाच
५. राघव - कवितांच्या संगतीत
६. हिमांशू डबीर - मनापासून मनापर्यंत
७. निलेश गद्रे - कोहम?


सत्र क्र. ४ – भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्रौ १०:३० ते रविवार दि. ६, पहाटे २:३०
सहभागी सदस्य:
१. मीनल गद्रे - उर्मी
२. संगीता गोडबोले - कसंकाय
३. प्राजक्ता पटवर्धन - प्राजु
४. अपर्णा - माझिया मना
५. नंदन होडावदेकर - मराठी साहित्य
६. हेरंब - वटवट सत्यवान !!
७. भानस - Sardesais
८. शंतनु देव - मेपलची पाने
. आशा जोगळेकर - झुळुक

धन्यवाद.

-शब्दबंध

5 comments:

Mrs. Asha Joglekar said...

मी आशा जोगळेकर ५ तारखेच्या चौथ्या सत्रांत असणार आहे मीनल गद्रे त्याच्या संचालिका आहेत त्यांना मी माझ्या रचनांची नावं पाठवीत आहे. खूप उशीरा कळवीत आहे त्या बद्दल दिलगीर आहे .
आशा जोगळेकर

नरेंद्र गोळे said...

सकाळी ९०० वाजता माझ्याच "ते माझे घर" या कवितेच्या अभिवाचनाने सुरू झालेला उत्स्फूर्त सहभागाचा, शब्दबंध-२०१० शब्दसोहळा, रात्री १०० वाजता सुफळ संपूर्ण झाला. यात सहभाग घेतलेल्या अनुदिनीधारकांचे हार्दिक अभिनंदन. मला स्वतःस या अवर्णनीय अनुभवाचा लाभ देणार्‍या निमंत्रक, सर्व सूत्रधार, सत्रधार तसेच तांत्रिक सल्लागार श्री.देवसाहेब व श्री रानडे साहेब यांस मनःपूर्वक धन्यवाद.

श्री.संतोष साळुंखे यांच्या "बोलीभाषा आणि परिभाषा" यांवरच्या चिंतनपर लेखापासून श्री.महेंद्र कुलकर्णींच्या तरल दैनंदिन अनुभववर्णनापर्यंतच्या वैविध्यपूर्ण विषयांवरच्या अभिरुचीपूर्ण साहित्याने ही परिषद संपन्न झाली. श्री.निलेश गद्रे यांच्या गोष्टीमुळे तर नव्या युगातील जगभर आपल्या कर्तृत्वाने ठसा उमटवणार्‍या विजिगिषू मराठी माणसांच्या मनातले चिरंतन द्वंद्व उत्तमरीत्या अभिव्यक्त झाले. श्रोत्यांना भरून आले. इथल्या भारतियांना आपल्या अनिवासी बांधवांच्या समस्यांची जाण आली. त्यांच्या समस्येवर मात करण्याच्या सामर्थ्याबद्दल सार्थ अभिमानही वाटला. एक नवाच शब्दबंध उदयास आला.

शब्दबंध-२०११ तसेच पुढील सर्व परिषदांना दैदिप्यमान यश मिळो हीच शुभेच्छा!

आपला स्नेहांकित
नरेंद्र गोळे

Indli said...

Your blog is cool. To gain more visitors to your blog submit your posts at hi.indli.com

अपर्णा said...

यावेळच्या शब्दबंधची घोषणा झाली नाही का??

मदन मोहन सक्सेना said...

बहुत खूब ,उम्दा पोस्ट के लिए बधाई |