
"शब्दबंध २०१०" ई-सभेमध्ये जवळजवळ सर्व सत्रांमध्ये उपस्थित असलेले जेष्ठ शब्दबंधी श्री. प्रमोद देव यांनी त्यांच्या पूर्वानुभव या ब्लॉगवर या ई-सभेचा आढावा घेतला आहे. त्यांच्या संमतीने तो इथे उतरवत आहे. अभिवाचन व श्रवण सहभाग असलेल्या शब्दबंधींच्या यादीत सुधारणा करण्यात आली आहे याची कृपया नोंद घ्यावी. शब्दबंधींच्या कार्यबाहुल्यामुळे वृत्तांत प्रकाशनाला प्रचंड विलंब झाला त्याबद्दल शब्दबंध व्यवस्थापकीय मंडळ दिलगीर आहे.
-----------------------------------------
होणार, होणार म्हणता म्हणता २०१० च्या शब्दबंधचे ई-संमेलन ५ जून २०१० रोजी पार पडले.
शब्दबंध २००९ च्या आधी जे एक उत्साहाचे वातावरण होते ते ह्यावेळी फारसे जाणवले नाही त्यामुळे ह्या २०१० च्या संमेलनात कसा प्रतिसाद मिळेल ह्याबाबत मी स्वत: साशंक होतो...पण तरीही प्रत्यक्ष संमेलनाच्या वेळी प्रत्येक सत्रात( प्रत्येकी साडेतीन तासांची चार सत्रे) अभिवाचक आणि श्रोत्यांची उपस्थिती लक्षणीय होती. उत्साहाने आपापल्या साहित्याचे वाचन करणारे अभिवाचक आणि दिलखुलास दाद देणारे श्रोते असे एकूण उत्साहाचे वातावरण दिसून येत होते. सकाळी ९ वाजता सुरुवात झालेले हे संमेलन उत्तररात्रीपर्यंत उत्तरोतर रंगतच गेले.
तांत्रिक बाजूंबद्दल बोलायचे झाल्यास....बर्याच सदस्यांना आणि श्रोत्यांना अजून स्काईप हे माध्यम नेमके कसे वापरायचे हे नीटसे कळलेले नाहीये. त्यामुळे सत्रसंचालकांना सत्र सुरु करतांना अनंत अडचणी येत होत्या आणि त्यात बराच वेळही वाया जात होता. ह्या इ-संमेलनाआधी सराव सत्र घेऊन सदस्यांना आणि श्रोत्यांना स्काईपबद्दलची पूर्ण माहिती,ध्वनीग्राहक (मायक्रोफोन) जोडणी,देवनागरीतून लेखन करण्यासाठी बरहा आयएमईचा वापर कसा करायचा वगैरे तांत्रिक माहिती पूरवून आम्ही आमच्या परीने खबरदारी घेतलेली होती...पण बरेचजण अशा सराव सत्रांना त्यांच्या त्यांच्या वैयक्तिक कारणांमुळे हजर राहू शकले नाहीत....अशा लोकांच्या आयत्यावेळी येण्यामुळे खूपच गोंधळ उडत होता. तरीही भगीरथ प्रयत्नांनी आम्ही सगळे त्यावर बर्यापैकी मात करून संमेलन यशस्वी करू शकलो...हेही नसे थोडके. मात्र एकच सांगतो...सभासदांनी स्काईपचा योग्य वापर कसा करावा....संमेलनाच्या वेळी काय काळजी घ्यावी ह्याबद्दलच्या सूचना नीट समजून घेऊन त्या जर व्यवस्थितपणे अंमलात आणल्या असत्या तर कदाचित वाया गेलेल्या वेळात अजून एखादे सत्र होऊ शकले असते असे अतिशयिक्तीने म्हणावेसे वाटते.

ह्यावेळच्या शब्दबंधमध्ये एकूण ३१ अभिवाचकांनी आपापले साहित्य वाचून दाखवले. कविता, प्रवासवर्णन, कथा, ललित लेखन, माहितीप्रद तसेच ऐतिहासिक महत्वाचे, विनोदी तसेच गंभीर, विचार करायला प्रवृत्त करणारे, करूण, भावूक करणारे असे विविध रसांनी नटलेले साहित्यप्रकार अभिवाचकांनी आपापल्या आवाजात सादर केले.
गेले दोन-अडीच महिने ह्या संमेलनाची तयारी सुरु होती.
ह्यावेळी संमेलनाचा संयोजक होता संग्राम भोसले. त्याला मदतनीस म्हणून मी आणि प्रशांत मनोहर होतो.
सभासदांना सराव सत्रापासूनच मी आणि विनायक रानडे हे तांत्रिक सहकार्य करून त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याचा यशस्वी प्रयत्न करत होतो.
ह्या संमेलनात अभिवाचक म्हणून सामील झालेले :
१)संग्राम भोसले (पुणे), २) प्रशांत मनोहर (नागपूर), ३) प्रमोद देव (मुंबई),४) प्रभाकर फडणीस (मुंबई) ५) विनायक रानडे (पुणे), ६) नरेंद्र गोळे (डोंबिवली), ६) जयंत कुलकर्णी (पुणे), ७) आशा जोगळेकर (अमेरिका), ८) श्रीराम पेंडसे (पुणे), ९) संतोष साळुंके (मलेशिया), १०) तुषार जोशी (नागपूर), ११) हर्षा स्वामी (पुणे), १२) अमोल वाघमारे, १३) प्रतिमा मनोहर (नागपूर), १४) विद्याधर भिसे (मुंबई), १५) अमेय धामणकर (ठाणे), १६) राहूल पाटणकर (पुणे), १७) महेंद्र कुलकर्णी (मुंबई), १८) नीलेश गद्रे (ऑस्ट्रेलिया), १९) अपर्णा लळिंगकर (बंगळुरु), २०) मीनल वाशीकर (कोल्हापूर), २१) मीनल गद्रे (अमेरिका), २२) प्राजक्ता पटवर्धन (अमेरिका), २३) हेरंब ओक (अमेरिका), २४) शंतनू देव (कॅनडा), २५) संगीता गोडबोले (अमेरिका), २६) भाग्यश्री सरदेसाई (अमेरिका), २७) नचिकेत कर्वे (अमेरिका), २८) अपर्णा संख्ये (अमेरिका), २९) समीर सामंत (मुंबई) ३०) श्रीकांत शिरभाटे आणि ३१) नंदन होडावदेकर (अमेरिका)
संमेलनात श्रोते म्हणून सामील झालेले....
१) सम्राट फडणीस (ई-सकाळ, पुणे) २) रविंद्र जाधव (मुंबई), ३) आनंद पत्रे (हैद्राबाद), ४) सागर बाहेगव्हाणकर (पुणे), ५) सुरेश पेठे (पुणे), ६) अनिकेत वैद्य (पुणे), ७) प्रशांत काळकर (पुणे) इत्यादि.
खास,संमेलनाच्या वृत्तांत संकलनासाठी ई-सकाळचे सहाय्यक संपादक सम्राट फडणीसही बहुतेक सत्रांमध्ये उपस्थित होते.
5 comments:
वा हे छान केलंत. हे आवश्यक होतं. विस्त़त वृतांत ही मिळेल ना ?
ह्यावेळी शब्दबंधची घोषणा झालीच नाही काय??? ते जूनच्या पहिल्या आठवड्यात असते ना... ?
ब्लॉग जगत में अनुनासिक की अनदेखी
अनुस्वार ,अनुनासिक की अनदेखी अपनी नाक की अनदेखी है .लेकिन नाक पे तवज्जो इतनी ज्यादा भी न हो
कि आदमी का मुंह ही गौण हो जाए .
भाषा की बुनावट कई मर्तबा व्यंजना में रहती है ,तंज में रहती है इसलिए दोस्तों बुरा न मनाएं .
आदमी अपने स्वभाव को छोड़ कर कहीं नहीं जा सकता .ये नहीं है कि हमारा ब्लॉग जगत में किसी से द्वेष है
केवल विशुद्धता की वजह से हम कई मर्तबा भिड़ जाते हैं .पता चलता है बर्र के छत्ते में हाथ डाल दिया .अब
डाल दिया तो डाल दिया .अपनी कहके ही हटेंगे आज .
जिनको परमात्मा ने सजा दी होती है वह नाक से बोलते हैं और मुंह से नहीं बोल सकते बोलते वक्त शब्दों को
खा भी जातें हैं जैसे अखिलेश जी के नेताजी हैं मुलायम अली .
लेकिन जहां ज़रूरी होता है वहां नाक से भी बोलना पड़ता है .भले हम नाक से बोलने के लिए अभिशप्त नहीं हैं .
अब कुछ शब्द प्रयोगों को लेतें हैं -
नाई ,बाई ,कसाई ......इनका बहुवचन बनाते समय "ईकारांत "को इकारांत हो जाता है यानी ई को इ हो जाएगा
.नाइयों ,बाइयों ,कसाइयों हो जाएगा .ऐसे ही "ऊकारांत "को "उकारांत " हो जाता है .
"उ " को उन्हें करेंगे तो हे को अनुनासिक हो जाता है यानी ने पे बिंदी आती है .
लेकिन ने पे यह नियम लागू नहीं होता है .ने को बिंदी नहीं आती है .बहने ,गहने पे बिंदी नहीं आयेगी .लेकिन
मेहमानों ,पहलवानों ,बहनों पे बिंदी आयेगी .
ब्लॉग जगत में आम गलतियां जो देखने में आ रहीं हैं वह यह हैं कि कई ब्लोगर नाक से नहीं बोल पा रहें हैं मुंह
से ही बोले जा रहें हैं .
में को न जाने कैसे मे लिखे जा रहें हैं .है और हैं में भी बहुत गोलमाल हो रहा है .
मम्मीजी जातीं "हैं ".यहाँ "हैं "आदर सूचक है मम्मी जाती है ठीक है बच्चा बोले तो लाड़ में आके .
अब देखिए हमने कहा में हमने ही रहेगा हमनें नहीं होगा .ने में बिंदी नहीं आती है .लेकिन उन्होंने में हे पे बिंदी
आयेगी ही आयेगी .अपने कई चिठ्ठाकार बहुत बढ़िया लिख रहें हैं लेकिन मुंह से बोले जा रहें हैं .नाक का
इस्तेमाल नहीं कर रहें हैं .
यह इस नव -मीडिया के भविष्य के लिए अच्छी बात नहीं है जो वैसे ही कईयों के निशाने पे है .
मेरा इरादा यहाँ किसी को भी छोटा करके आंकना नहीं है .ये मेरी स्वभावगत प्रतिक्रिया है .
कबीरा खड़ा सराय में चाहे सबकी खैर ,
ना काहू से दोस्ती ना काहू से वैर .
आप की पोस्ट बहुत अच्छी है आप अपनी रचना यहाँ भी प्राकाशित कर सकते हैं, व महान रचनाकरो की प्रसिद्ध रचना पढ सकते हैं।
प्रशांत शब्दबंध अजान चालू आहें का ?
Post a Comment